दापोलीत विवाहितेची हत्या, सासऱ्याचा स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील टाळसूरे या गावातील आरती अभिषेक सणस (वय 32 वर्ष) या विवाहितेचा खून करण्यात आला असून तिच्या मृत्यूनंतर तिच्या सासऱ्यांनी देखील आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (29 मार्च) रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास आरती सणस यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरती सणस या आशा सेविका […]
ADVERTISEMENT
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील टाळसूरे या गावातील आरती अभिषेक सणस (वय 32 वर्ष) या विवाहितेचा खून करण्यात आला असून तिच्या मृत्यूनंतर तिच्या सासऱ्यांनी देखील आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज (29 मार्च) रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास आरती सणस यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरती सणस या आशा सेविका होत्या.
आरती सणस यांचा त्यांच्याच घरातीलच कोणीतरी खून केल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आरती सणस यांचा खून झाल्यावर तिचे सासरे मधुकर धोंडू सणस यांनी स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना जखमी अवस्थेत डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेची हत्या, प्लास्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह
सदर मयत विवाहितेचा विवाह आठ ते नऊ वर्षापूर्वी झाला असून तिला सहा वर्षाचा मुलगा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राथमिक अंदाजावरून या महिलेचा खून हा जवळच्या व्यक्तीकडून झाला असल्याचा दाट संशय असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद, दापोली पोलीस निरीक्षक आहिरे पोलीस पथकासहीत दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुन्हा एकदा महिलेच्याच खुनाची घटना दापोली तालुक्यात घडली असल्याने सुसंस्कृत तालुका पुन्हा हादरला आहे.
ADVERTISEMENT
सावंतवाडीत दोन महिलांची निर्घृण हत्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात काही महिन्यांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. दोन वयोवृद्ध महिलांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं होतं.
सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथे ही घटना रविवारी (31 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास घडली होती. सावंतवाडी शहरातील भरवस्तीत दोन महिलांचे खून झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली होती. कारण हत्या झालेल्या दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने लंपास झाले होते.
नीलिमा नारायण खानोलकर आणि तिच्यासोबत राहणाऱ्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत हिची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांना सर्वप्रथम ही घटना झाल्याचं समजलं होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं.
राजू मसुरकर हे रविवारी सकाळी काही कामनिमित्त नीलिमा खानोलकर यांच्या घरी गेले होते. मात्र, घरात जाताच अत्यंत भयंकर दृश्य त्यांना पाहायला मिळालं. घरातील दोन्ही महिला या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या त्यांना दिसून आल्या.
ADVERTISEMENT