सांगली : निवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याचं घर फोडलं, २३ तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगलीत चोरट्यांनी निवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याचं घर फोडून सोनं-चांदीचे दागीने लंपास केले आहेत. विश्रामबाग परिसरातील LIC कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार विठ्ठल कोळी यांच्या घरी ही घरफोडी झाली असून चोरट्यांनी २३ तोळ्यांचे दागिने पळवले आहेत.

या चोरीमुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यासमोर चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल कोळी हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या प्लॅटची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला. यानंतर घरातील २३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करत धूम ठोकली.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लापा पुजारी आणि मिरज डीवायएसपी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, पण आता सरळसरळ निवृत्त पोलिसाच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले असल्याचे दिसून येते आहे.

हिंगोली: शेतीच्या वादातून हत्या, दुहेरी हत्याकांडात 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT