काँग्रेसचा दारुण पराभव तर भाजपला फायदा : देशभरातील पोटनिवडणुकांचा निकाल
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी घोषित झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला 12 हजार 776 मतं मिळाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. महाराष्ट्राशिवाय देशभरातील विविध […]
ADVERTISEMENT

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी घोषित झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला 12 हजार 776 मतं मिळाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.
महाराष्ट्राशिवाय देशभरातील विविध राज्यांमध्येही आज पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्या जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या, त्या राखण्यात देखील काँग्रेसला अपयश आलं आहे. तर भाजपचा एका जागेचा आणि के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीलाही एका जागेचा फायदा झाला आहे.
देशभरातील विविध पोटनिवडणुकांचा निकाल :
-
बिहार :
बिहारमध्ये विधानसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील एका जागेवर भाजप आणि एकावर राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे. गोपाळगंज विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि राजदमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार कुसुम देवी यांनी आघाडी घेऊन राजदच्या मोहन प्रसाद गुप्ता यांचा अवघ्या १७९३ मतांनी पराभव केला.