पतीला आई-वडिलांपासून वेगळं करणं हा मानसिक छळ: कलकत्ता हायकोर्ट
पतीला त्याच्या पालकांपासून दूर राहायला सांगणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे आणि कोणत्याही पतीला मानसिक छळाच्या आधारावर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे
ADVERTISEMENT

पतीला त्याच्या पालकांपासून दूर राहायला सांगणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे आणि कोणत्याही पतीला मानसिक छळाच्या आधारावर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे, असा निकाल देत कोलकाता उच्च न्यायालयाने एका घटस्फोट अर्जाला मंजुरी दिली आहे. (Any husband has the right to divorce his wife on the ground of mental cruelty, The Calcutta High Court)
कौंटुबिक न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाला एका महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या महिलेच्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. महिलेने पतीवर आई-वडिलांना सोडण्यासाठी दबाव टाकला आणि पती-पत्नी दोघेही वेगळे राहू लागले, असा पतीचा दावा होता.
Dalai Lama video : चुंबन व्हिडीओचा वाद वाढला! दलाई लामांनी सोडलं मौन, म्हणाले…
उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावताना अनेक महत्वाची निरीक्षण नोंदवली. न्यायालय म्हणाले, पतीला आई-वडील आणि कुटुंबापासून वेगळे करण्याचा प्रयत्न म्हणजे एक प्रकारचा मानसिक छळ आहे.पत्नीने मानसिक छळ केल्यास तसंच कोणतेही ठोस कारण न देता पतीला पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडले, तर पतीला पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे.आई-वडिलांचा सांभाळ करणे ही मुलाची जबाबदारी आहे. भारतात मुलगा लग्नानंतरही आई-वडिलांसोबत राहणे सामान्य गोष्ट आहे.
2009 पासून सुरू झाली कायदेशीर लढाई :
संबंधित पती-पत्नीची ही कायदेशीर लढाई 2009 पासून सुरू होती. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले होते. मात्र काही दिवस गेल्यानंतर दोघांमध्येही कुरबुरी सुरु झाल्या. पती-पत्नीने कौंटुबिक न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, पती व्यवसायाने शिक्षक होता आणि तो घर चालविण्यापुरतेही पैसे मिळवू शकत नव्हता, आपल्याच कुटुंबात कमावणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त होती, असा पत्नीने दावा केला होता.










