Shubhangi Patil : अन् ‘मविआ’च्या उमेदवार थोरातांकडून रिकाम्या हाताने परतल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Nashik graduate constituency election 2023 Shubhangi patil)

ADVERTISEMENT

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी प्रवेश नाकारल्याने रिकाम्याच हाताने परतावं लागलं आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्याविरोधात त्या मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांना थोरात यांची भेट मिळू शकली नाही. या प्रकाराची सध्या परिसरात मोठी चर्चा सुरु आहे. (candidate of Mahavikas Aghadi of Nashik Graduate Constituency Shubhangi Patil denied entry to the senior Congress leader Balasaheb Thorat’s home)

नेमकं काय घडलं?

शुभांगी पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. या दरम्यान, त्या शुक्रवारी थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात आल्या होत्या. संगमनेमध्ये शिवसैनिकांनी पाटील यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठकही पार पडली. मात्र या बैठकीला काॅंग्रेस कार्यकर्ते आणि नेते अनुपस्थित होते.

हे वाचलं का?

यानंतर पाटील कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी गेल्या. मात्र तिथं त्यांना गेटवर अडवण्यात आलं. बाळासाहेब थोरात आणि कुटुंबीय वैद्यकीय कारणाने मुंबईत दाखल असल्याने त्यांच्या संगमनेरच्या निवासस्थानी कोणीही नाही. त्यामुळे वॉचमनने त्यांना गेटवरच अडवलं. यानंतर शुभांगी पाटलांना माघारी परतावं लागलं. दरम्यान थोरात यांच्याशी सकाळीच फोनवरून चर्चा केल्याचा दावाही पाटील यांनी केला होता. त्यानंतरही त्या थोरात यांच्या निवासस्थानी का गेल्या? असा प्रश्न या विचारला जात आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचं धुमशान सुरु आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानंतर काँग्रेसने तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसंच त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

भाचा की पक्ष? बाळासाहेब थोरांतांची काँग्रेसकडूनच कोंडी!

सत्यजीत तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. अशातच बाळासाहेब थोरातही शुभांगी पाटील यांच्या प्रचारात दिसतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. पटोले यांच्या याच विधानामुळे थोरात यांची कोंडी झाल्याचं बोललं जातं आहे. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा की मामा-भाच्याच नातं संभाळायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा असल्याच्या चर्चा आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT