कल्याण : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भयंकर अपघात; कारचा चक्काचूर
राज्यभरात खड्डेमय रस्त्यांच्या मुद्दा चर्चिला जात असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कल्याण ग्रामीण भागातील कल्याण-शीळ रोड रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कारचा चालकाचा जीव थोडक्यात वाचला. कल्याण-शीळ रोडवर अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडीचा […]
ADVERTISEMENT
राज्यभरात खड्डेमय रस्त्यांच्या मुद्दा चर्चिला जात असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कल्याण ग्रामीण भागातील कल्याण-शीळ रोड रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कारचा चालकाचा जीव थोडक्यात वाचला.
ADVERTISEMENT
कल्याण-शीळ रोडवर अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला, तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या भयंकर अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अधांतरी पडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Kalyan : गांधारी पूल वाहतुकीसाठी सुरक्षीत, २० तासांनी पूल वाहनचालकांसाठी खुला
हे वाचलं का?
अपघात कसा झाला?
गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात होता. या दरम्यान पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हायडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोरात जाऊन धडकली.
ADVERTISEMENT
Kalyan: बिल्डर पिता-पुत्राची मुजोरी, क्षुल्लक कारणावरुन रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण
ADVERTISEMENT
त्या डिव्हायडर म्हणून लावलेल्या पत्र्यावर आदळल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेल्या एका दुकानात सूरज भारद्वाज नावाचे रहिवासी झोपले होते. कार अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानं त्यांनी आवाज झालेल्या दिशेनं धाव घेतली.
Kalyan : आईकडून २०० रुपये घेऊन पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडला तरुण, ओव्हरटेक करण्याच्या नादात गमावला जीव
तोपर्यंत आणखी काही लोकं घटनास्थळी जमा झाले होते. अपघातस्थळी असलेल्या काहींनी गाडीतून आकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात पाठविण्यात आले. या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्राटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT