कोरोनाचा कहर : केंद्रीय पथकाकडून अमरावती शहराची पाहणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता केंद्र सरकारच्या पथकाने आज अमरावती शहराला भेट दिली. अमरावती शहरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढीस का लागले याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उप संचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीममधील निपुण विनायक यांनी आज अमरावती शहराला भेट दिली.

ADVERTISEMENT

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक भागांमध्ये गर्दी कशी कमी करता येईल याची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय पथकाने दिले आहेत. ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे तिकडे कंटेन्मेंट झोन जाहीर करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत. या दौऱ्यात विनायक निपुण यांनी शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यानंतर केंद्रीय पथक श्रीकृष्णपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आलं.

या दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे व इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT