Agni veer होण्यासाठी तयारी करताय? मग ही गुड न्यूज फक्त तुमच्यासाठी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Agniveer Recruitment:

ADVERTISEMENT

दिल्ली : भारतीय लष्करात (Indian Army) अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) सशस्त्र सीमा बल (BSF) मधील रिक्त पदांवर अग्निशमन जवानांसाठी 10% आरक्षण जाहीर केले आहे. इतकचं नाही तर अग्निवीरला वयोमर्यादेच्या निकषांमध्येही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हे अग्निवीर पहिल्या बॅचचा भाग आहेत की त्यानंतरच्या बॅचेसचा यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे. (Central govt has declared 10% reservation for ex-Agniveers in vacancies within BSF)

गृह मंत्रालयाने 6 मार्च रोजी यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. यात अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (BSF), जनरल ड्युटी कॅडर भर्ती नियम 2015 मध्ये सुधारणा केली आहे. यासाठीची अधिकृत राजपत्र अधिसूचना 6 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, बीएसएफच्या भरती परीक्षेत, अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्येही सूट मिळणार आहे.

हे वाचलं का?

वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट :

या अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबल पदासाठी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळणार आहे. तर त्याचबरोबर माजी अग्निवीरांना ३ वर्षांची सूट मिळणार आहे. यापूर्वी भारतीय लष्कराने अग्निवीरच्या भरती प्रक्रियेत बदल केला होता. उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला बसावं लागतं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवार मैदानावर सामील होतील.

ADVERTISEMENT

भरतीचा शेवटचा टप्पा वैद्यकीय चाचणी असणार आहे. यातून एक प्रकारे भरती मेळाव्यातील गर्दी कमी करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. आत्तापर्यंत भरती प्रक्रियेत प्रथम मैदानावरील चाचणी घेतली जात होती. या प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात यायची. यानंतर परीक्षा व्हायची. मात्र आता या बदलानंतर उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेच्या तयारीसाठीही वेळ मिळणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT