लखीमपूर हिंसा : मृतांचा आकडा आठ वर, केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा आठवर पोहचला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात येतो आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अतिरीक्त पोलीस संचालक अरुण कुमार सिंग यांनी या प्रकारात मृतांचा आकडा आठवर गेल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीला घडलेल्या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतांच्या […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा आठवर पोहचला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात येतो आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अतिरीक्त पोलीस संचालक अरुण कुमार सिंग यांनी या प्रकारात मृतांचा आकडा आठवर गेल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीला घडलेल्या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Eight persons have died in Lakhimpur incident, says Additional SP Arun Kumar Singh
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष उर्फ मोनू गेला होता. यावेळी आशिषच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आणि आंदोलनकर्ते शेतकरी समोरासमोर आले. ज्यानंतर मोनूच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकारानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील तीन गाड्या पेटवून दिल्या. लखीमपूर मधील परिस्थिती बिघडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ADG प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवलंय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं स्पष्टीकरण देत, लखीमपूरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय.