पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची सुटका, चंद्रपूर पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची पोलीस कर्मचार्‍यांनी सुटका केली आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व 22 ट्रक चालकांची सुटका केली आहे. चंद्रपुरच्या गडचांदूर मार्गावरील वर्धा नदिच्या पुलावर हे पाणी वाहत होते. या सर्व ट्रक चालकांनी आपले ट्रक पुलाच्या बाजूला उभे केले होते. सर्वांनी पुलावरचे पाणी कमी होण्याची वाट पाहिली परंतु पाणी वाढतच गेले. हे सर्व चालक परराज्यातील होते.

ADVERTISEMENT

दोन दिवसांपासून हे ट्रक चालक आपल्या ट्रकमध्येच बसून राहिले होते. मात्र काल संध्याकाळी पाणी वेगाने वाढू लागले आणि पुलाच्या आजूबाजूला पाणी तुंबले त्यामुळे सर्व ट्रक पाण्याखाली गेले, तीन किलोमीटरपर्यंत पूल पाण्याखाली गेला आणि 22 ट्रक चालकांच्या मृत्यूचा धोका निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. रात्रीची वेळ आणि सगळीकडे पाणी, रात्रीच्या अंधारात पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे सोपे काम नव्हते. पोलिसांच्या ऑपरेशनदरम्यान वरुन पावसाची सतत धार सुरुच होती. तरीही चंद्रपूर पोलीस कर्मचार्‍यांनी मोठ्या जिद्दीने बचाव मोहीम राबवून पुरात अडकलेल्या सर्व 22 ट्रक चालकांचे प्राण वाचवले, काल सायंकाळी सुरू झालेले हे बचावकार्य आज पहाटे 4 वाजेपर्यंत चालले.

हे वाचलं का?

दरम्यान राज्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्याला पावसाने झोडपून काढले आहे. पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे, नाशिक आणि पालघरला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाआहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागलाआहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT