संभाजीराजे छत्रपतींची प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. 26 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. खासदार संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून त्यांचे बीपीही लो झाले आहे. त्यामुळे रूग्णालयात दाखल व्हा असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. मात्र राजे उपोषणावर ठाम आहेत. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीच हा लढा आहे तो सुरुच ठेवणार असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठीच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले की गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली आहे. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या २२ मागण्या आहेत त्यापैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लावल्या जाव्यात अशी विनंती मी केली आहे. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असंही नाही असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

सरकारने शब्द न पाळल्याने उपोषण सुरू करण्याशिवाय पर्यायच उरला नाही-संभाजीराजे

डॉक्टरांनी काय सांगितलं?

ADVERTISEMENT

संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की साठ तासांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची शुगर कमी झाली आहे तसंच रक्तदाबही कमी झाला आहे. हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. शुगर वाढण्यासाठी इंजेक्शन घ्या, असं सांगितलं होतं मात्र संभाजीराजेंनी नकार दिला आहे.

ADVERTISEMENT

संभाजीराजेंनी काय म्हटलं होतं उपोषणाच्या दिवशी?

मराठा आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही. पंधरा दिवसात मागण्या मंजूर करतो असं सरकारने सांगितलं होतं. मात्र आजतागायत काहीही तोडगा काढला नाही. त्यानंतर आम्ही रायगड आणि नांदेडलाही आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दखलही सरकारने घेतली नाही, इतकं दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू करण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT