Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: राज्यभरात शिवजंयतीचा उत्साह, आग्र्यातही शिवरायांचा जयघोष
chhatrapati shivaji maharaj jayanti 2023: मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची जयंती आज (19 फेब्रुवारी) महाराष्ट्रासह जगभरात साजरी केली जात आहे. राज्यात तर अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. तसंच अनेक ठिकाणी शिवजयंती (Shivjayanti) निमित्ताने भव्य मिरवणुकांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक सांस्कृतिक […]
ADVERTISEMENT

chhatrapati shivaji maharaj jayanti 2023: मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची जयंती आज (19 फेब्रुवारी) महाराष्ट्रासह जगभरात साजरी केली जात आहे. राज्यात तर अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. तसंच अनेक ठिकाणी शिवजयंती (Shivjayanti) निमित्ताने भव्य मिरवणुकांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. (chhatrapati shivaji maharaj jayanti 2023 the excitement of shiv jayanti across the state)
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी लाखो शिवभक्त हे किल्ले शिवनेरीवर पोहचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील किल्ले शिवनेरीवर पोहचले असून त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा यावेळी पार पडला आहे. दुसरीकडे यंदा पहिल्यांदाच आग्र्याच्या लाल किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाकडून परवानगीही देण्यात आली आहे. याच कार्यक्रमासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्र्याला जाणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी इतिहास संशोधक करण राजे बांदल यांनी केला नवा दावा
शिवाजी महाराज: दूरदृष्टी असणारे राज्यकर्ते
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जे काही कार्य केलं त्यामागे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. त्यामुळेच तब्बल ३५० साडेतीनशे वर्षानंतरही त्यांचं कार्य हे अबाधित आहे. शिवाजी महाराजांनी तत्कालीन काळात संरक्षणाच्या दृष्टीने केलेलं कार्य हे किती महत्त्वाचं होतं हे आजच्या परिस्थितीवरुन देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. भविष्यात भारत भूमीवर समुद्रमार्गे देखील शत्रूकडून हल्ला होऊ शकतो हे साडेतीन वर्षांपूर्वीच महाराजांनी ताडलं होतं. यामुळेच त्यांनी समुद्रावर आपलं आरमार स्थापन केलं. याच आरमाराची परिणीती आपल्याला आजच्या अत्याधुनिक नौदलामध्ये दिसतं.