नक्षलवाद्यांकडून प्रचंड मोठा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद

मुंबई तक

Naxalaite Attack : छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला (Naxalaite Attack)  केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांची आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (chhattisgarh dantewada naxalaite attack jawan martyred) […]

ADVERTISEMENT

chhattisgarh dantewada naxalaite attack
chhattisgarh dantewada naxalaite attack
social share
google news

Naxalaite Attack : छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला (Naxalaite Attack)  केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांची आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (chhattisgarh dantewada naxalaite attack jawan martyred)

दंतेवाडाच्या (Dantewada) अरनपुरमधून डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (DRG) फोर्सला घेऊन जाणाऱ्या वाहनावर (Naxalaite Attack) नक्षलवाद्यांनी IED या स्फोटकाने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत 11 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये 10 डिआरजीचे जवान होते तर 1 ड्रायव्हर होता. या हल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नक्षलवाद्यांना (Naxalaite Attack) घेरल्याची माहिती आहे. आता पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जवान एका मोठ्या ऑपरेशनसाठी निघाले होते.यावेळी अरनपूरच्या पालनार भागातून जाणाऱ्या जवानांच्या गाडीला IED या स्फोटकाने उडवले होते. सध्या घटनास्थळी दोन अॅम्ब्यूलन्स पाठवण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा पॅटर्न अजूनही बदलला नाही आहे. जेव्हा भारतीय जवान त्यांच्या भागात आल्याचे कळताच, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती बस्तरचे आईजी सुंदरराज यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp