मुख्यमंत्री ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांना लगावले प्रचंड टोले
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना बरेच टोले लगावले. काल (2 मार्च) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना सरकारवर जबरदस्त टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना बरेच टोले लगावले. काल (2 मार्च) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना सरकारवर जबरदस्त टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-
कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर शेरेबाजी
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंनी वाचली विंदांची कविता – ते जरा समजून घे
कुणी प्रश्न विचारला म्हणजे तो देशद्रोही आहे असं नाहीए.
ADVERTISEMENT
जिथे आम्ही चूक करु तिथे आमचे वाभाडे जरुर काढा, पण महाराष्ट्राची बदनामी करु नका
ADVERTISEMENT
आरेची जागा अपुरी पडेल, त्यामुळे कांजूर कारशेड प्रकरणी कुणी इगो मध्ये आणू नये.
बाबरी पाडली तेव्हा बाळासाहेब एकटे ठामपणे उभे होते.
बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचे नव्हते
अजून तुम्ही बाळासाहेबांना विसरला नाहीत हे महत्त्वाचं आहे.
वेगळा होणार नाही, विदर्भ वेगळा होऊ देणार नाही
देश तुमची खासगी मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही.
देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही, ती शेतकऱ्यांची सुद्धा मालमत्ता आहे.
केवळ भारत माता की जय म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही.
शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नसेल, पण तुमची मातृसंस्था देखील कधीच स्वातंत्र्य संग्रामात नव्हती.
उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच राष्ट्रीय सेवा संघावर हल्ला
शेतकरी काय अतिरेकी आहे का?
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे
काम करतो चुका करतो आणि जो चुका करतो तोच काम करतो.
लसीकरणाच्या अॅपमध्ये चुका झाल्या. पण मी लगेच केंद्रावर टीका करत नाही.
माझी थट्टा करताय जरुर करा, पण जनतेच्या जीवाशी करु नका
कुणी मला खलनायक ठरवलं तरी मी माझ्या जनतेची काळजी आहे
पेट्रोलची सेंच्युरी, गॅसची हजारी… हेच यांचं आत्मनिर्भर भारत
कोरोना काळात सरकारने बरंच काम केलं आहे.
मी सातत्याने परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्यासाठी वारंवार विनंती केली, पण ती मान्य झाली नाही आणि जेव्हा थांबवायची गरज होती, तेव्हा सगळं मोकळं केलं.
कोरोना व्हायरस म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन….
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांच्या वतीने मागितली सभागृहाची माफी
विरोधी आमदारांकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने सभागृहात गोंधळ
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या नारायण भंडारी कथेवरुन मुख्यमंत्र्यांनी केली टोलेबाजी, तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलं टार्गेट
भारत आता एकही मॅच हरणार नाही कारण आता स्टेडियमचं नाव बदललंय … पटेलांचं नाव पुसून टाकलं
महाराष्ट्र भिकारी आहे का, केंद्राच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायला?
संभाजीनगर आधीच करु, पण त्याआधी आम्ही विमानतळाला दिलेलं नाव कोणी अडवून ठेवलं आहे ते सांगा
सरदार पटेल , सावरकर आमचे…असे तुम्ही म्हणता… तुम्ही नवीन आदर्श तयार केले नाहीत, जे आहेत ते घेताहेत
सावरकरांना भारतरत्न द्या, याची मागणी करणारी 2 पत्र आम्ही यापूर्वी लिहिली
सीमाप्रश्नी सोबत येण्याच्या भूमिकेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार, याप्रश्नी आपण सोबत केंद्राकडे जाऊ
आम्ही लोकांना भरलेली थाळी दिली, आम्ही रिकाम्या थाळ्या नाही दिल्या वाजवायला.
राज्यपाल मराठीत बोलले हेही नसे थोडके
उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच सुधीर मुनगंटीवार यांना लगावले जबरदस्त टोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT