मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार,राजीनाम्याचा प्रश्नच नाही; संजय राऊत यांचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार इतर कुणालाही मुख्यमंत्री होऊ देणार नाही. इतर कुणालाही मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येणार नाही. वर्षा बंगल्यावर शरद पवार आले होते. त्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली त्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. फ्लोअर टेस्ट झाली तर आम्ही बहुमत सिद्ध करू तशीही आमची तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेसाठी २१ जून हा दिवस अत्यंत भीषण असा ठरला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेनेला खिंडार पाडलं आहे. शिवसेनेच्या निम्म्यापेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील हेदेखील एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. गुवाहाटीला ते पोहचले आहेत

Exclusive : एकनाथ शिंदे यांच्याकडे ४६ आमदारांचं बळ, लवकरच पुढचा निर्णय

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं ते शिवसेनेतलं आत्तापर्यंत सर्वात मोठं बंड ठरलं आहे. शिवसेना सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी थेट बंडाचा झेंडा उद्धव ठाकरेंच्याविरोधातच उगारला आहे.

उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून महाराष्ट्राच्या जनेतशी संवाद साधला. त्यांनी हे देखील सांगितलं की समोर येऊन माझ्याशी चर्चा करा. मला सांगा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहू नका मी आत्ता मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. एवढंच काय तुम्ही सांगत असाल तर मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पदही सोडतो असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे यांनी जो संवाद साधला त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडलं आणि ते मातोश्री या ठिकाणी गेले.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या बंडाचे दिग्दर्शक उद्धव ठाकरे?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर…

ADVERTISEMENT

मातोश्री या ठिकाणी जात असताना वर्षा या निवासस्थानी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार आहेत. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी हे ठामपणे सांगितलं आहे की फ्लोअर टेस्टही द्यायची आम्ही तयारी करतो आहोत आणि वेळ आल्यास ते सिद्ध करण्याचीही तयारी आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शेवटपर्यंत संघर्ष करणार हे ट्विटही संजय राऊत यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्या बंडाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे ३७ आमदार जर एकनाथ शिंदेंसोबत गेले तर सरकार अल्पमतात येईल. भाजपने या सगळ्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका सध्या घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT