चितळे बंधूंचं सीम्मोलंघन! आता मुंबईतही मिळणार बाकरवडी
पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे बंधू यांच्या मिठाईची आणि बाकरवडीची चव आता मुंबईकरांनाही चाखता येणार आहे. कारण मुंबईतल्या दादर आणि विले पार्ले या ठिकाणी चितळे बंधू मिठाई दुकानांच्या दोन शाखा सुरु कऱण्यात आल्या आहेत. चितळे एक्स्प्रेस असं नाव देऊन ही दुकानं सुरु कऱण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुणेकर अभिमान सांगत असलेली बाकरवडी आता मुंबईतही मिळणार आहे. दादरच्या […]
ADVERTISEMENT
पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे बंधू यांच्या मिठाईची आणि बाकरवडीची चव आता मुंबईकरांनाही चाखता येणार आहे. कारण मुंबईतल्या दादर आणि विले पार्ले या ठिकाणी चितळे बंधू मिठाई दुकानांच्या दोन शाखा सुरु कऱण्यात आल्या आहेत. चितळे एक्स्प्रेस असं नाव देऊन ही दुकानं सुरु कऱण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुणेकर अभिमान सांगत असलेली बाकरवडी आता मुंबईतही मिळणार आहे. दादरच्या रानडे रोडवर चितळे बंधू मिठाई दुकानाची एक शाखा उघडण्यात आली आहे. तसंच पार्ले या ठिकाणीही या दुकानाची शाखा उघडण्यात आली आहे. अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
ADVERTISEMENT
निखिल चितळे यांनी ट्विट केला व्हिडीओ
मराठी पाऊल पडते पुढे. आमची २ Xpress दुकाने आज दादर व पार्ला, मुंबई मधे सुरु झाली. मुंबई चा ऊत्साह अतुलनीय आहे. ????@ChitaleGroup #ChitaleGroup pic.twitter.com/W17HUXs65I
— Nikhil Chitale (@nikhilchitale) January 28, 2021
ठाण्यातही चितळे बंधू
हे वाचलं का?
याआधी ठाण्यात चितळे बंधू मिठाई हे दुकान सुरु करण्यात आलं होतं. ठाण्यातील नौपाडा या ठिकाणी असलेल्या गोखले रोडवर चितळे बंधू यांच्या दुकानाची शाखा उघडण्यात आली. नोव्हेंबर 2020 या महिन्यात हे उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता चितळे बंधूंचं पाऊल मुंबईतही पडलं आहे. निखिल चितळे यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.
चितळे बंधू यांच्या मिठाईच्या दुकानातील अस्सल महाराष्ट्रयीन चवीचे पदार्थ आता मुंबईकरांनाही चाखायला मिळणार आहेत. बाकरवडी, पोह्याचा चिवडा, जिलबी, श्रीखंड, आंबा बर्फी, तूप, या सगळ्यांसह विविध पदार्थांची खास चितळे टच असलेली चव आता मुंबईकरांनाही चाखायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT