Yogi Adityanath यांच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावर संतापले नसीरूद्दीन शाह, म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता, आता सगळ्यांना समान न्याय मिळतो. 2017 पूर्वी जे अब्बा जान म्हणत होते तेच रेशन संपवत होते असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत नसीरूद्दीन शाह?

योगी आदित्यनाथ यांनी केलेलं अब्बाजान वक्तव्य हे आक्षेपार्ह असून अपमानास्पद आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखंही काही नाही असंही शाह यांनी म्हटलं आहे. ही व्यक्ती (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) जी आहे त्यावर प्रतिक्रिया काय देणार? अब्बा जान हे वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे, अशा प्रकारची वक्तव्यं ते आधीपासून बोलत होते अशीही टीका नसीरूद्दीन शाह यांनी केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नसीरूद्दीन शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला की, ‘समाजवादी पार्टीचे सरकार गरीबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. 2017 च्या आधी गरीबांना रेशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरीबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते आणि त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरीबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT