'आरशात पाहिलं की लायकी कळेल', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'आपली लायकी...', श्रीकांत शिंदेंची घणाघाती टीका!

point

'4 जूनला जनता उत्तर देईल...', श्रीकांत शिंदेंचं विरोधकांना आव्हान

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात प्रचारसभा दणक्यात सुरू आहेत. अशा परिस्थितीत, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.  'हे माजी मंत्र्याचे संस्कार दिसतात.' असाही टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. 

ADVERTISEMENT

2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिवसेनेचे विभाजन झाले. यानंतर आदित्य ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीही आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर गंभीर आरोप करत टीका केली होती यावर आता श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला आहे.

'आपली लायकी...', श्रीकांत शिंदेंची घणाघाती टीका!

खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं, 'आरशामध्ये पाहिलं की, आपली पात्रता, आपली लायकी, आपली औकात काय हे कळेल.' 

हे वाचलं का?

'आपली लायकी काय त्याप्रमाणे बोललं पाहिजे. लायकी फोनवर बोलायची आहे, त्यावरच बोललं पाहिजे. लायकी नसताना, आपण ज्यांच्यावर बोलतो, हे जनता बघत असते, तुमची पात्रता काय, तुमचं योगदान काय? त्यामुळे आरशामध्ये पाहिलं की, आपली पात्रता, आपली लायकी, आपली औकात कळेल', अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

4 जूनला जनता उत्तर देईल...

'यांच्यावरती असे-कसे संस्कार केले. ज्यांच्या तोंडी शिव्या शाप आहे, असे शब्द मी बोलूही शकत नाही. आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत. आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलं आहे, वाईट बोलयला शिकवलं नाही. ज्यांनी त्यांना हे बोलायला शिकवलं, त्यांना येत्या 20 तारखेला आणि 4 जूनला निकालाच्या दिवशी जनता उत्तर देईल.' अशा आव्हानात्मक शब्दात आदित्या ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT