Meghalaya : ‘मविआ’ पार्ट – २ सपशेल फसला; सर्वात मोठ्या पक्षासोबत काय घडलं?

मुंबई तक

Meghalaya government formation: मेघालयमध्ये (Meghalaya) महाराष्ट्राच्या (Maharashtra) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सत्तास्थापनेसाठी २६ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एनपीपीला बाजूला सारून वेगळी राजकीय आघाडी करण्याचा प्रयत्न होता. मात्र ३ दिवसांत घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काल (रविवारी) युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) या पक्षांनी कोनराड संगमा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Meghalaya government formation: मेघालयमध्ये (Meghalaya) महाराष्ट्राच्या (Maharashtra) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सत्तास्थापनेसाठी २६ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एनपीपीला बाजूला सारून वेगळी राजकीय आघाडी करण्याचा प्रयत्न होता. मात्र ३ दिवसांत घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काल (रविवारी) युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) या पक्षांनी कोनराड संगमा यांच्या एनपीपी पक्षासोबत युती करत सरकारला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी आपल्या समर्थनाचे पत्र कोनराड संगमा यांच्याकडे सुपूर्द केले. (The UDP and the PDF are allies of the NPP in the outgoing Meghalaya Democratic Alliance (MDA) government)

यानंतर कोनराड संगमा यांनी ट्विट करत सांगितलं की, “युडीपी आणि पीडीएफ या पक्षांनी सरकार स्थापनेसाठी एनपीपीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. राज्यातीलच दोन महत्त्वाच्या पक्षांची साथ मिळाल्यामुळे आता मेघालय आणि मेघालयच्या जनतेसाठी आम्हाला ठोस असे काम करणे शक्य होणार आहे.”

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मेघालयमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. निकालात संगमा यांच्या एनपीपीला सर्वाधिक २६ जागा मिळाल्या. तर युडीपीला दोन नंबरच्या म्हणजे ११ जागा मिळाल्या. निकालानंतर अवघ्या काही तासांतच २ आमदार असलेल्या भाजपने एनपीपीला आपले समर्थन देऊ केले. दुसऱ्याच दिवशी एनपीपी आणखी दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. तसेच हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एनपीपीकडे ३२ आमदारांचं संख्याबळ झालं होतं. बहुमतासाठी ३१ आमदारांची गरज होती.

Rabri Devi: माजी सीएमच्या घरी सीबीआय पथक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी चौकशी

हे वाचलं का?

    follow whatsapp