PM Modi: ‘श्रमिकांना मोफत तिकिटं देऊन, मुंबईतून मूळ गावी पाठवून काँग्रेसने कोरोना पसरवला’, PM मोदींचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला लोकसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी (Corona first wave) कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप करत तुफान टीकाही केली.

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील श्रमिकांनी मुंबई सोडून जावी यासाठी काँग्रेसने तिथे फुकट रेल्वेची तिकटं वाटली. काँग्रेसच्या या कृत्यामुळेच उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसने हातपाय पसरले.’ असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर केला आहे.

पाहा पंतप्रधान मोदी काय-काय म्हणाले;

हे वाचलं का?

‘काँग्रेसने तर हद्दच केली…’

‘कोरोना ही वैश्विक महामारी होती. पण त्याचा देखील घाणेरड्या राजकारणासाठी वापर झाला. काय ही मानवतेसाठी चांगली बाब आहे? विशेषत: भारतासारख्या देशासाठी. या कोरोना काळात तर काँग्रेसने हद्दच केली. मी आता तर फक्त एवढंच म्हणालो की, हद्द केलीए.’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर सुरुवातीलाच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत काँग्रेसने श्रमिकांना फुकट तिकिटं वाटली’

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं, जेव्हा WHO जगभरातील लोकांना सल्ला देत होतं की, सगळे आरोग्य तज्ज्ञ म्हणत होते की, जो जिथे आहे त्याने तिथेच थांबावं. संपूर्ण जगात हाच संदेश दिला जात होता.’

‘कारण मनुष्य जिथे जाईल आणि जर तो कोरोनाने संक्रमित असेल तर कोरोना सोबत घेऊन जाईल. तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काय केलं की, मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मुंबई सोडून जाण्यास प्रोत्साहित केलं. मुंबईत श्रमिकांना तिकिटं दिली. ती देखील मोफत तिकिटं दिली.’

‘लोकांना प्रेरित केलं गेलं की जा.. महाराष्ट्रात आमच्यावर तुमचा जो बोजा आहे तो कमी करा. जा.. तुम्ही उत्तरप्रदेशचे आहात, जा तुम्ही बिहारचे आहात.. जा तिकडे आणि तिकडे कोरोना पसरवा. तुम्ही… हो तुम्ही हे खूप मोठं पाप केलं. तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. तुम्ही आमच्या श्रमिक भाऊ-बहिणींना बऱ्याच अडचणीत टाकलं.’ असं म्हणत मोदींनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली.

‘…यांच्यामुळेच उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोना पसरला’

‘दुसरीकडे दिल्लीत असं सरकार होतं की, जे आजही आहे. त्या सरकारने तर जीपवर माइक बांधून दिल्लीतील झोपडपट्टीत फिरुन लोकांना सांगितलं की, संकट मोठं आहे. इथून निघून जा. गावी जा… दिल्लीतून जाण्यासाठी यांनी बसेसही दिल्या. पण अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं आणि श्रमिकांसाठी बऱ्याच अडचणी निर्माण केल्या. या सगळ्यामुळे यूपीमध्ये, उत्तराखंडमध्ये, पंजाबमध्ये ज्या कोरोनाची एवढी गती नव्हती एवढी तीव्रता नव्हती तिथे देखील कोरोनाने या एका गोष्टीमुळे हातपाय पसरले.’ असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

‘एवढ्या मोठ्या संकटातही यांनी छोटं पवित्र काम करता आलं नाही’

‘हे कसं राजकारण आहे?, मानव जातीवर संकट ओढावलेलं असताना हे कसलं राजकारण सुरु आहे. हे घाणेरडं राजकारण कधीपर्यंत चालेल? काँग्रेसच्या आचरणामुळे फक्त मीच नव्हे तर संपूर्ण देश अचंबित आहे. दोन वर्षांपूर्वी देश 100 वर्षातील सगळ्यात मोठ्या संकटाशी लढत होता. काही लोकांनी ज्या पद्धतीने व्यवहार केला त्यामुळे देश विचारात पडला आहे.’

‘काय हा देश तुमचा नाहीए? या देशातील लोकं आपली नाहीत?, त्यांचे सुख, दु:ख तुमचे नाही? एवढं मोठं संकट आलं.. अनेक नेत्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केलं असतं की, मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग ठेवा.. तर आज चित्र वेगळं असतं. पण किती नेत्यांनी असं केलं? यामुळे भाजपच्या सरकारला काही फायदा झाला असता का? मोदीला काय फायदा झाला असता?’

PM Modi Twitter Hack : मोदींचं अकाऊंट हॅक करताना Internal System चा वापर नाही – सूत्रांची माहिती

‘मात्र, एवढा मोठ्या संकटातही एवढंसंही पवित्र काम यांना करता आलं नाही. म्हणून काही लोकं आहेत की, जे या गोष्टीची वाट पाहत होते की, कोरोना व्हायरस मोदींच्या प्रतिमेला हानी पोहचवेल. खूप वाट पाहिली त्यांनी गोष्टीची. कोरोनाने देखील आपल्या धैर्याची कसोटी पाहिली आहे.’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर तुफान टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT