महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी; राहुल गांधींचं भाजप-संघावर टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आज ही रॅली वाढत्या महागाईविरोधात आहे. मात्र, देशात आज जी परस्थिती निर्माण झाली आहे, ती पूर्वी कधीही झाली नव्हती. देशातील जनता देश चालवत नसून, केवळ 3-4 भांडवलदार चालवत आहेत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आज शक्तिप्रदर्शन करत जयपूरमध्ये रॅली काढली. या रॅलीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारसह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र डागलं.

“देशात यापूर्वीही कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. देशातील सर्व स्वायत्त संस्था एका संघटनेच्या आणि एकाच हातात आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये आरएसएसचे (RSS) ओएसडी (OSD) बसले आहेत. 3-4 भांडवलदार देश चालवत आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“मी हिंदू, हिंदुत्ववादी नाही”

ADVERTISEMENT

याच रॅली राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. “दोन शब्दाचा आत्मा एकसारखा असू शकत नाही. हे दोन शब्द हिंदू आणि हिंदुत्ववादी हे आहेत. या दोन्ही शब्दांचा आत्मा एकच असू शकत नाही. मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. या देशात दोन शब्दांची लढाई आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा हिंदुत्व. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होता”, अशा शब्दात राहूल गांधींनी भाजप व संघावर टीकेचे बाण डागले.

ADVERTISEMENT

“हिंदूंना सत्तेत आणायचंय”

राहुल गांधी म्हणाले, “हिंदू सत्यासाठी मृत्यू पत्करतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे, तो आयुष्यभर सत्याच्या शोध घेत असतो. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला. पण गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याच्या बाबतीत काही देणंघेणं नाही. हिंदुत्ववादी द्वेषाने भरलेले आहेत, कारण त्यांच्या मनात भीती असते,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

“तुम्ही सगळे हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेले असतात. 2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत. हिंदू सत्तेतून बाहेर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना बाहेर हाकलून हिंदूंना सत्तेत आणायचं आहे. आम्हाला घाबरवलं जाऊ शकत नाही. आपण मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवीये, सत्य नकोय. महादेवासारखंच हिंदू आपली भीती प्राशन करून टाकतात,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT