ममता बॅनर्जी-मायावतींना जे जमलं ते पवारांना जमलं नाही – Nitin Raut यांचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या मालकासारखी झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. ‘मुंबई तक’ला वर्षपूर्तीनिमीत्त दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी काँग्रेसवर हा निशाणा साधला. या टीकेचे राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटले आहेत. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनीही आज शरद पवारांवर पलटवार केला आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांनी काँग्रेसची काळजी करु नये, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला असला तरीही ते आतापर्यंत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवू शकले नाहीत अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या नितीन राऊत यांनी काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “काँग्रेस पक्षावर अनेकवेळा अशी स्थिती आली. त्यातून हा पक्ष बाहेर पडला आणि पुन्हा उभा राहिला. आताही पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पवारांनी काँग्रेसची चिंता करू नये. दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा.”

हे वाचलं का?

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी- शरद पवारांचं परखड भाष्य

पवार हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. ते महाराष्ट्रात सत्तेत आमचे सहकारी आहेत. मात्र एका मित्र पक्षाबद्दल, ते अशी टीका करणार असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका सहन केली जाणार नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांनी त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाची स्वबळावर सत्ता आणली. त्या मुख्यमंत्री बनल्या. पण पवार तसे करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये, असंही नितीन राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT