Nana Patole Exclusive : पटोलेंचा राष्ट्रवादीवर संशय… पवारांवर काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेची. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची सोडल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरीच टीका झाली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडायला नको होती, असं म्हणतं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

दरम्यान, याच सर्व गोष्टीवर नाना पटोले यांनी सविस्तर प्रक्रिया दिली. ‘मुंबई तक’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी या आरोपांवर उत्तर दिलं. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आणि काही अंशी संशयही व्यक्त केला.

प्रश्न: तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच तुमची कारकीर्द वादग्रस्त ठरली. पवारही म्हणाले की, ठरवलेलं विधानसभा अध्यक्षपद सोडलं. तुम्ही अध्यक्षपदी राहिला असता तर बरं झालं नसतं?

हे वाचलं का?

नाना पटोले : पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आमचा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री कोणाला ठेवायचं, कोणाला मंत्री ठेवायचं हे त्यांनी घेतले. आम्ही सांगू त्याला ते उपमुख्यमंत्री करतील काय? अजित पवारांना काढून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री करा म्हटलं असतं तर केलं असतं का?

आमच्या पक्षाच्या हायकमांडने जो निर्णय घेतला त्याला बांधील राहणं हे माझं काम आहे. पक्ष श्रेष्ठीने सूचना दिल्या की तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मी एक मिनिटं त्याला किंतु-परंतु न ठेवता मी त्यावेळेस उद्धव ठाकरे, अजित पवारांना भेटलो आणि सांगितलं हायकमांडने राजीनामा देण्यास सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

मी काँग्रेसचा शिपाई आहे मला हायकमांडने दिलेला आदेश पाळणं हे माझं कर्तव्य आहे. मग वर्षभर तुम्ही आमचा अध्यक्ष होऊ दिला नाही. दर अधिवेशनमध्ये आम्हाला फिरवलं, आम्ही सातत्याने उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीकडे जात होते. सारखा पाठपुरावा केला. पण ते म्हणायचे मताचा फरक होईल.. मी त्यांना सांगितलं की, 172 मतं आपल्या जवळ आहे. पाच-सात मतांचा झाला तर होईल. पण तुमचा विधानसभा अध्यक्ष हरू शकत नाही. पण मुद्दामून केलं नाही.

ADVERTISEMENT

12 आमदारांचं जे अपात्रतेचं झालं होतं.. मी विधानसभेत असा ठराव करून घेतला होता की, कोणत्याही कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं आम्हाला बंधनकारक नाही. असं एकमताचा ठराव विधानसभेत केलेला. असं असता तुम्ही कसे 12 आमदार येऊ दिले. तुम्ही अध्यक्ष होऊ दिलं नाही तर तुम्हीच तेव्हा अध्यक्ष होते ना. नरहर झिरवळ हे जवळजवळ अध्यक्षच होते. त्यांनाच अधिकार होते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो प्रश्न होता त्यामध्ये नियम शिथिल करायचे अधिकारही अध्यक्षाला आहेत. मी आमच्या राहुल नार्वेकरांना विधानसभेत सांगत होते की, तुम्हाला फक्त बाईचा माणूस आणि माणसाचा बाई करता येत नाही. एवढंच तुमच्या हातात नाही. पण विधानसभेच्या कामकाजातील नियंत्रण ठेवणं हे अधिकार तुम्हाला आहे. ती वारंवार नियमावर बोट ठेवणं जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याऐवजी तुम्ही दाबता आहात. हे चुकीचं आहे.

सांगायचं तात्पर्य असं आहे की, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तुम्हाला घेता आला असता. का नाही केला? नाना पटोले असता तर सरकार पडलं नसतं. नाना पटोले ही काही व्यक्ती नाही. ती खुर्ची आहे. त्या खुर्चीचे जे संविधानी अधिकार आहेत ते वापरायचे अधिकार त्या व्यक्तीला आहेत.

आता तुम्हाला ते वापरता आले नाही तर त्यात माझा काय दोष आहे. मग तुम्ही आमचा विधानसभा अध्यक्ष होऊ द्यायला पाहिजे होता. तुम्हाला नाही करु द्यायचा होता तर तो तुमचा प्रश्न होता आणि ज्या गोष्टी घडल्या आमच्यासाठी त्या आम्हाला कळतात. पण आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून, मुद्दाम सांगतोय की, या सगळ्या गोष्टी विसरून भाजपसारख्या देश व्यवस्थेला संपविणाऱ्या या भाजपच्या विरोधात लोकांना एकत्र ठेवून आम्हाला भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं आहे. हा प्रयत्न आहे.

आम्हाला सत्तेचं काही नाही.. आमची सत्ता गेली.. आज लोकांना अपेक्षित आहे की, काँग्रेसच सत्तेत हवी. ही भूमिका जनेतेची आहे. आम्ही जनता आणि देशासाठी लोकांमुळे चाललो आहे. पण ज्यांना एकीकडे सोबत राहायचं आणि दुसरीकडे गडबड करायची..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT