Himachal Pradesh Result : भाजप काहीही करु शकतो; धसका घेत काँग्रेसचे चाणक्य लागले कामाला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धरमशाला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं दणक्यात पुनरागमन केलं आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचत ४० जागा जिंकून काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला. तर भाजपला अवघ्या २५ जागांवर समाधान मानवं लागलं. मात्र बहुमताचा आकडा मिळाल्यानंतरही भाजपचा काही नेम नाही, भाजप काहीही करु शकतो असा आरोप करत काँग्रेसनं विजयी उमेदवारांना राजस्थान किंवा छत्तीसगढला हलविण्याची तयारी सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या सूत्रांनी ‘आज तक’ला दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना आधी चंदीगडमध्ये एकत्र आणण्यात येणार आहे. तिथं आमदारांची एक बैठक पार पडेल आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल. विजयी उमेदवारांना सध्या काँग्रेसशासित राजस्थान किंवा छत्तीसगडमध्येही हलवले जाऊ शकते. काँग्रेसने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्याकडे आमदारांच्या प्रवासाची जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजीव शुक्लाही चंदीगडला जाणार आहेत.

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं एक वक्तव्य समोर येत आहे. ते म्हणाले, मी तिथला पर्यवेक्षक होतो, त्यामुळे मी हिमाचल प्रदेशला जाणार आहे. आमच्या सहकाऱ्यांची काळजी घ्यायला हवी. भाजप काहीही करू शकते.

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा आणि शिमल्यामधून निवडून आलेले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार विक्रमादित्य सिंह म्हणाले, आम्ही पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन करु आणि हे सरकार ५ वर्षे कोणत्याही अडचणींविना चालेल. आम्हाला आमच्या मित्रांची काळजी घ्यावी लागेल कारण भाजप काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते.

हिमाचलमध्ये मेघालय आणि गोव्यासारखी परिस्थिती होऊ दिली जाणार नाही. निकालानंतर सर्व आमदारांना तात्काळ सुरक्षित स्थळी नेण्यात येणार आहे. हिमाचलच्या मातीतत आम्ही हॉर्स ट्रेडिंग होऊ देणार नाही. भाजपने कोणतीहा प्लॅन आखूदे, तपास यंत्रणांचा वापर करु दे किंवा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करु दे आम्ही आमच्या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवू, असेही विक्रमादित्य सिंह म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT