नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिकच्या येवला शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने आईसह तीन मुलींवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. येवला पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाने मुलीवर जादूटोणा झाल्याचं सांगत आपल्या भावासह गेल्या दोन वर्षांपासून आई आणि मुलींवर अत्याचार केला.

ADVERTISEMENT

सुफी अजीज अब्दुल बाबा आणि जब्बार शेख अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. पीडित महिला येवल्याच्या नागडे गावात रहायच्या. आपल्या मुलींचं लग्न जमत नसल्यामुळे महिला त्यांना एका बाबाकडे घेऊन गेली. यावेळी बाबाने तिला तुझ्या मुलीवर जादूटोणा झाला आहे असं सांगितलं. यानंतर भोंदूबाबाने परिस्थितीचा फायदा घेऊन चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला.

यावेळी बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट करुन या बाबाने आईसह तिन्ही मुलींवर सलग दोन वर्ष ४ महिन्यांच्या काळात शारिरिक अत्याचार केले. याचसोबत या भोंदूबाबाने धमकी देऊन पैसेही उकळल्याचं समोर आलंय. आरोपी भोंदूबाबाने यापैकी एका मुलीला हिंदू धर्माबद्दल मनात द्वेष निर्माण करुन मुस्लीम धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केले. येवला पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करुन प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT