दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी ‘हे’ आहेत नियम,लस निवडीचा पर्याय आहे?
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येतेय. भारतातही फ्रंटलाईन वर्कर्ससोबतच आता १ मार्चपासून लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाची घोषणा केली. यावेळी दुसऱ्या टप्प्यातली लसीकरण […]
ADVERTISEMENT

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येतेय. भारतातही फ्रंटलाईन वर्कर्ससोबतच आता १ मार्चपासून लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे.
केंद्र सरकारनं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाची घोषणा केली. यावेळी दुसऱ्या टप्प्यातली लसीकरण मोहिमेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्यामुळे तुमच्या मनातही दुसऱ्या टप्प्यातल्या या लसीकरण मोहिमेत आपण स्वतःला कसं सामील होऊ शकतो, त्यासाठी कोणते नियम आणि अटी आहेत, असा प्रश्न पडला असेल. तुमच्या मनातल्या याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटांत मिळणार आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे महापौर, आमदार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर भाजपकडून तुफान टीका https://t.co/8Wz8PlqFUu @ShivSena @BJP4Maharashtra
— Mumbai Tak (@mumbaitak) February 25, 2021
कोणत्या वयोगटातल्या लोकांना मिळणार लस?
दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी सरकारने वयोगट निश्चित केलाय. त्यानुसार ६० वर्षाहून अधिक वय असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. तसंच ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तिंचाही यामध्ये समावेश आहे.
खासगी दवाखान्यात लसीची किंमत किती?
दुसऱ्या टप्प्यात खासगी दवाखान्यांनाही लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी देण्यात आलीय. सरकारी केंद्रांवर लस मोफत मिळेल. तर खासगी केंद्रांवर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. सरकारनं अजून यासाठीचे दर निश्चित केले नाहीत. येत्या काही दिवसांतच सरकारकडून हे दर जाहीर केले जातील.