भारतात मे महिन्यात रोज पाच हजारांपेक्षा जास्त Corona मृत्यू होणार IHME चा अहवाल

मुंबई तक

भारतात मे महिन्याच्या मध्यात कोरोना मृत्यूंचा उच्चांक गाठला जाणार आहे. दररोज 5 हजार 600 मृत्यू होऊ शकतात असा इशारा US Study च्या अहवालाने दिला आहे. याचाच अर्थ एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतात सुमारे साडेतीन लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होऊ शकतो असंही या अहवालाने म्हटलं आहे. अवघ्या 15 दिवसात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

भारतात मे महिन्याच्या मध्यात कोरोना मृत्यूंचा उच्चांक गाठला जाणार आहे. दररोज 5 हजार 600 मृत्यू होऊ शकतात असा इशारा US Study च्या अहवालाने दिला आहे. याचाच अर्थ एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतात सुमारे साडेतीन लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होऊ शकतो असंही या अहवालाने म्हटलं आहे.

अवघ्या 15 दिवसात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशेन (IHME) या वॉशिंग्टन च्या संस्थेने COVID-19 projections या नावाने अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 15 एप्रिलला प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारतात दुसरी लाट ही महाभयंकर ठरणार असून यामध्ये सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेवर उपाय म्हणून फक्त राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात आलेली लसीकरण मोहिमेकडेच पाहिलं गेलं आहे.

गेल्या काही आठवड्यात भारतात कोरोनाची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे. देशात दुसरी लाट आली आहे. अशात आता येत्या काही आठवड्यांमध्ये ही स्थिती आणखी बिघडू शकते असंही IHME च्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या सगळ्या तज्ज्ञांनी भारतात वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाचा आणि मृत्यूंबाबत अभ्यास करून मग आपलं मत मांडलं आहे.