मोठी बातमी ! सचिन वाझेंची क्राईम ब्रांचमधून बदली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने मोठं पाऊल उचलत मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असलेल्या सचिन वाझे यांची बदली करुन त्यांना दुसऱ्या विभागात पाठवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. मंगळवारच्या कामकाजात विरोधकांनी सचिन वाझेचं निलंबन करुन त्याला अटक करण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे म्हणतात…

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत बोलत असताना एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात जो कोणी दोषी आढळेल…मग तो सचिन वाझे असो किंवा कोणाचा जावई असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. तोपर्यंत सचिन वाझे यांना क्राईम ब्रांचमधून हलवून दुसऱ्या विभागात टाकण्यात येत असल्याचं अनिल देशमुख यांनी जाहीर केलं. हिरेन यांच्या तपासात सचिन वाझेंचा सहभाग कुठेही येऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं देशमुख यांनी जाहीर केलं.

हे वाचलं का?

गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत वाझेंच्या बदलीची घोषणा केल्यानंतरही विरोधकांनी गदारोळ घातला. सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. जोपर्यंत वाझे यांना अटक केली जाणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा विरोधीपक्षाने घेतल्यामुळे उप-सभापतींनी कामकाज थांबवलं. दरम्यान गृहमंत्र्यांनी वाझे यांच्या ट्रान्स्फरची घोषणा केल्यानंतर सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी वाझे यांना बदलीसंदर्भात प्रश्न विचारला असता वाझे यांनी काहीही न बोलणं पसंत केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT