Gangrape : बर्थडे पार्टीत मादक द्रव्य पाजलं आणि नंतर पाच जणांनी…

मुंबई तक

Gangrape Crime News : 16 वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor girl gang-raped) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीये. आरोपींनी अल्पवयीन मुलीला आधी मादक द्रव्य पाजलं आणि त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. हैदराबादमध्ये (hyderabad) ही घटना घडली असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यात एका मुलीचाही समावेश आहे. (Minor girl gang raped by Five youth […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Gangrape Crime News : 16 वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor girl gang-raped) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीये. आरोपींनी अल्पवयीन मुलीला आधी मादक द्रव्य पाजलं आणि त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. हैदराबादमध्ये (hyderabad) ही घटना घडली असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यात एका मुलीचाही समावेश आहे. (Minor girl gang raped by Five youth in hyderabad)

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या हैदराबादमध्ये ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. मात्र, पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

अल्पवयीन सामूहिक बलात्कार : नक्की काय घडलं?

छत्रीनाका भागात रात्रीच्या वेळी 16 वर्षीय मुलगी मेडिकलच्या दुकानात गेली होती. त्याच भागात राहणाऱ्या एका मुलीने पीडित मुलीला भाईगुडा परिसरातील मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत येण्यासाठी आमिष दाखवलं.

Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

हे वाचलं का?