जुन्नर-आळेफाटा येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, रोख रक्कम पळवली
पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातली रोख-रक्कम पळवली आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या दरम्यान चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील […]
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातली रोख-रक्कम पळवली आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या दरम्यान चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या आधारावर तपासाला सुरुवात केली आहे.
मुंबईच्या रस्त्यावर भर दिवसा ‘बर्निंग टॅक्सीचा’ थरार
हे वाचलं का?
काही दिवसांपूर्वीच अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा म्रुत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे. ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT