पिंपरी-चिंचवड : उधार न दिल्यामुळे ग्राहकाकडून बेकरीची तोडफोड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बेकरी मालकाने उधारीवर वस्तू देण्यास नकार दिल्यामुळे ग्राहकाने रागाच्या भरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी-चिंचवड जवळील काळेवाडी परिसरात असलेल्या न्यू रॉयल बेकरीत हा प्रकार घडला आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरच्या रात्री ३ ते ४ ग्राहक न्यू रॉयल बेकरीत खाण्यापिण्याचं सामान घेण्यासाठी आले होते. यावेळी ग्राहकांनी दुकानदाराकडे वस्तू उधार द्या असा तगादा लावला. परंतू दुकानदाराने वस्तू उधार मिळणार नाही असं ठामपणे सांगितलं.

या गोष्टीमुळे राग आलेल्या ग्राहकांनी दुकानात जोरदार तोडफोड केली. ग्राहकांनी दुकानात दगडफेक करुन वस्तूंची नासधूस केली. ज्यात दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थाळी दाखल झाले असून त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

वाशिम : ज्वेलर्सचं दुकान फोडून १०-१५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला, घटना CCTV मध्ये कैद

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT