बारामती : दिवसाढवळ्या घरफोडी करुन ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती तालुक्यातील कऱ्हावगज भागात दिवसाढवळ्या घराची कुलूपं तोडून अज्ञात चोरट्यांनी २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केल्याचं कळतंय.

कऱ्हावगज येथील, मच्छिंद्र बनकर आणि गोरख बनकर हे सख्खे भाऊ शेजारी शेजारी राहतात. घरातील सर्व लोक हरभरा तूर खुरपण्यासाठी शेतात गेली होती. मच्छिंद्र बनकर घरी होते मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते देखील रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १५ तोळ्या पेक्षा जास्त दागिने चोरून नेले.

पुणे : ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घरासमोरच राहणारे त्यांचे भाऊ गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप कटावणीने उचकटून तीन गंठण, अंगठ्या, राणीहार, सोनसाखळ्या असा जवळपास १८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. गोरख आणि मच्छिंद्र जानकर यांचे दोघांचे मिळून जवळपास २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी आहेत. दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. हे दागिने बनकर कुटुंबाने घरातल्या लग्नकार्यासाठी तयार केले होते.

ADVERTISEMENT

बारामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या सहाय्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची तलवार दाखवत दहशत; घटना सीसीटीव्हीत कैद

    follow whatsapp

    ADVERTISEMENT