अरुण गवळीच्या दगडी चाळीवर म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

९० च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आपलं नाव गाजवणारा डॉन अरुण गवळीची दगडी चाळ लवकरच इतिहास जमा होणार आहे. दगडी चाळीचा लवकरच पुनर्विकास केला जाणार असून म्हाडाने यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दगडी चाळीतल्या १० इमारतींपैकी ८ इमारती या अरुण गवळीच्या आहेत, तर उर्वरित दोन इमारतीही गवळी कुटुंबाने विकत घेतल्या आहेत. म्हाडा या जागेवर ४० मजल्याचे दोन टॉवर बांधणार आहे.

“या चाळीचा पुनर्विकास करायचा असेल तर यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी लागणारं बिल्डरला लागणार Letter of Intent म्हाडाकडून देण्यात आलं आहे. या चाळीतील १० इमारती गवळी कुटुंबाच्या आहेत. याचा पुनर्विकास व्हावा यासाठी त्यांनी म्हाडाकडे प्रस्ताव दिला होता. ज्याला म्हाडाने मान्यता दिली आहे.” म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी मुंबई तक शी बोलताना माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परवानगी देण्याआधी सर्व भाडेकरुंची परवानगी असल्याचं पत्र आम्हाला मिळालं आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही परवानगी देण्यात आल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली. परंतू दगडी चाळीच्या पुनर्विकासासाठी ही पहिली पायरी असून यानंतर रिडेव्हलपमेंटच्या प्लानमध्ये अनेक बदल होऊन NOC मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. ही NOC मिळाल्यानंतरच दगडी चाळ पाडून नवीन बांधकाम सुरु करण्यात येईल.

ADVERTISEMENT

दगडी चाळीत असलेल्या १० पैकी दोन इमारतींची अवस्था जीर्ण झालेली असल्यामुळे त्या आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामधील भाडेकरुनंची ट्रान्झिस्ट कँपमध्ये सोय करण्यात आली आहे. अरुण गवळीची मुलगी आणि नगरसेविका गिता गवळीनेही या पुननिर्माण प्रकल्पाला सर्व भाडेकरुंनी मान्यता दिल्याचं सांगितलंय. चाळीतील सर्व भाडेकरुंच्या भल्याचा आम्ही विचार करतोय. आता पात्र असलेल्या भाडेकरुंची नावं नोंदवून सर्व प्रक्रीया पार पडायला किमान एक ते दीड वर्ष जाईल. यानंतरच कामाला सुरुवात होईल असं गिता गवळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT