मुंबईकरांनो काळजी घ्या! कालच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी परंतू ७ रुग्णांच्या मृत्यूने चिंता कायम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबईसाठी आज काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कालच्या तुलनेत आज शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काहीप्रमाणात कमी झालेली आहे. शनिवारी शहरात २० हजार ३१८ रुग्ण सापडले होते. आज ही संख्या १९ हजार ४७४ वर आली आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या जरी कमी आली असली तरीही ७ रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं टेन्शन अजुनही कायम आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत सध्याच्या घडीला सक्रीय रुग्णसंख्या १ लाख १७ हजार ४३७ एवढी झालेली आहे. त्यात गेल्या २४ तासांमध्ये ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता अजुनही कायम आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी १ हजार २४० रुग्ण हे रुग्णालयात भरती झाले आहेत. मुंबईत दिवसभरात एकूण ६८ हजार २४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्याच्या घडीला मुंबई शहरात एकूण १७ कंटेनमेंट झोन आहेत. मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत एकूण १२३ इमारती सील केल्या असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ४१ दिवसांवर पोहचला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी नवीन निर्बंधांची घोषणा केली. ९ जानेवारी रात्री १२ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधाप्रमाणे यंदाचे निर्बंध कठोर नाहीयेत. परंतू या निर्बंधांमध्ये राज्य सरकारने आज महत्वाचा बदल केला आहे.

शनिवारी जाहीर केलेल्या निर्णयात राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू सुधारित आदेशात सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

ADVERTISEMENT

Corona in India: सुप्रीम कोर्टही कोरोनाच्या कचाट्यात, आतापर्यंत चार न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT