दापोलीची जमीन, डोळे दिपवणारी बजरंग खरमाटेची मालमत्ता; पाहा IT च्या धा़डसत्रात काय आलं समोर?
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बजरंग खरमाटे, सदानंद कदम यांच्या राज्यातील काही मालमत्तांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या एकूण २६ जागांवर आयकर विभागाने छापेमारी केली. मुळचा केबल ऑपरेटर असलेला सदानंद कदम हा अनिल परब यांचा बिजनेस पार्टनर असून शिवसेना नेते रामदास कदम यांना भाऊ […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बजरंग खरमाटे, सदानंद कदम यांच्या राज्यातील काही मालमत्तांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या एकूण २६ जागांवर आयकर विभागाने छापेमारी केली. मुळचा केबल ऑपरेटर असलेला सदानंद कदम हा अनिल परब यांचा बिजनेस पार्टनर असून शिवसेना नेते रामदास कदम यांना भाऊ आहे. याव्यतिरीक्त RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याही मालमत्तांवर छापेमारी झाली.
ADVERTISEMENT
आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात २०१७ साली अनिल परब यांनी १ कोटींमध्ये जमिनीचा एक तुकडा खरेदी केला होता. परंतू या जमिनीच्या कागदपत्रांची नोंदणी २०१९ साली करण्यात आली, हीच जमीन अनिल परब यांनी २०२० साली सदानंद कदम यांना १ कोटी १० लाखांत विकली. जोपर्यंत जमीन ही परब यांच्या नावावर होती तोपर्यंत या जागेवर रिसॉर्टचं बांधकाम सुरु होतं. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही जमीन परब यांनी कदम यांना विकली. अनिल परब यांनी रिसॉर्टच्या बांधकामाविषयीची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना दिली नाही आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरताना फक्त जमिनीचे पैसे भरल्याचं आयकर विभागाला कळलं आहे. २०१७ साली या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर अंदाजे ६ कोटींचा खर्च झाला. परंतू या बांधकामाचा खर्च अनिल परब किंवा सदानंद कदम यांच्या बँक खात्यातून झालेला नाही.
RTO अधिकारी आणि मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या बजरंग खरमाटेकडेही संपत्तीचं घबाड आयकर विभागाला सापडल्याचं समोर येतंय. खरमाटे आणि त्याच्या परिवाराच्या नावावर गेल्या १० वर्षात पुणे, सांगली, बारामती अशा ठिकाणी मालमत्ता असल्याचं आयकर विभागाच्या तपासणीत समोर आलंय. खरमाटेच्या नावावर पुणे परिसरात एक बंगला आणि फार्म हाऊस तसेच तळेगाव भागात आणखी एक फार्महाऊस असल्याचं समोर आलं आहे. याव्यतिरीक्त सांगलीत दोन बंगले, दोन हिऱ्यांची दुकानं, पुण्यातील विविध ठिकाणी ५ फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट आणि सांगली-बारामती व पुणे या तीन भागांत मिळून १०० एकरांपेक्षा जास्त जमीन बजरंग खरमाटे आणि त्याच्या परिवाराच्या नावावर आढळली आहे. खरमाटेच्या मालमत्तेचा आढावा घेण्याचं काम अजुनही सुरु आहे. याचसोबत खरमाटे परिवार इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, हिऱ्याच्या दागिन्यांची दुकानं, सिव्हील कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट आणि पाईप मॅन्युफॅक्चरिंग बिजनेसमध्ये असल्याचंही आयकर विभागाच्या चौकशीत समोर आलं आहे.
हे वाचलं का?
खरमाटेच्या नावावर असलेला कन्स्ट्रक्शन बिजनेस हे त्याच्या परिवारातील सदस्य चालवायचे आणि या कंपनीला सरकारची अनेक कामही मिळाल्याचं आयकर विभागाच्या तपासणीत समोर आलं आहे. तब्बल २७ कोटींच्या किमतीची कंत्राट खरमाटेने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मिळवल्याचंही या चौकशीत समोर आलंय. याव्यतिरीक्त बारामती येथील छापेमारीत २ कोटींची बेहिशोबी रक्कम आयकर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात बजरंग खरमाटेविरुद्ध आयकर विभागाने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे.
या कारवाईदरम्यान आयकर विभागाने ६६ लाखांची बेहिशोबी रक्कम ताब्यात घेतली आहे. याव्यतिरीक्त डिजीटल टेडा आणि अन्य काही कागदपत्रांची पुढील तपासणी होते आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणातही बजरंग खरमाटेची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT