कोल्हापूर : घरगुती वादातून उच्चशिक्षीत मुलीने केला वडिलांचा खुन, स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात एका मुलीने घरगुती वादातून आपल्याच वडिलांची लोखंडी गजाने मारहाण करत हत्या केल्याचं कळतंय. इचलकरंजी इथल्या बर्गे मळा परिसरात ही घटना घडली असून शांतीनाथ केटकाळे असं मृत वडिलांचं नाव आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगी साक्षी केटकाळे ही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय. बर्गे […]
ADVERTISEMENT
कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात एका मुलीने घरगुती वादातून आपल्याच वडिलांची लोखंडी गजाने मारहाण करत हत्या केल्याचं कळतंय. इचलकरंजी इथल्या बर्गे मळा परिसरात ही घटना घडली असून शांतीनाथ केटकाळे असं मृत वडिलांचं नाव आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगी साक्षी केटकाळे ही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय. बर्गे मळा परिसरात केटकाळे कुटुंब राहतं. शांतीनाथ केटकाळे यांचं त्यांच्या घराशेजारीच एक छोटसं दुकान असून त्यांना तीन मुली आहेत. रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास घरात वादाला सुरुवात झाली. ज्या वादातून साक्षीने लोखंडी गजाने वडिलांना मारहाण केली. ज्यात शांतीनाथ यांच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला.
फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
केटकाळे यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी मुलगी साक्षी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे घरात वाद निर्माण झाला आणि हत्येमागचं नेमकं कारण काय याची अद्याप माहिती समजू शकलेली नाहीये. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
चंद्रपूर : पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी राहिली गर्भवती; आईने सुपारी देऊन केली हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT