काँग्रेसच्या सात आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला क्रॉस व्होटिंग केलं, पृथ्वीबाबांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोनिया गांधींचा आदेश धुडकावून काँग्रेसच्या सात आमदारांनी भाजपला विधान परिषद निवडणुकीत भाजपला पैसे घेऊन मतं दिली. चंद्रकांत हांडोरेच्या ऐवजी विधान परिषदेत त्यांनी भाजपला क्रॉस व्होटींग केलं. अशा लोकांना पक्षाकडून संरक्षण मिळतं असेल तर काय बोलणार? असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई तकच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. याच अनुषंगाने दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे G23 हा आता G20 झाला आहे. याबद्दल आता पुढे काय करायचं ते इतक्यात सांगणार नाही. मात्र काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. कपिल सिब्बल, जितेंद्र प्रसाद आणि गुलाम नबी आझाद पक्ष सोडून गेले आहेत. जे घडलंय ते टाळता आलं असतं. कारण काही लोकांना हे घडवायचं होतं असं वाटायला लागलं आहे.

आनंद शर्मा यांच्याबाबत विचार करायचा झाला तर त्यांना सुकाणू समितीचं अध्यक्ष केलं होतं सोनिया गांधी यांनी. मात्र पाच निवडणुका त्यांच्या शिवाय घेतल्या गेल्या. सोनिया गांधी यांचा आदेशही धुडकावून लावला जातो आहे हे कशाचं लक्षण आहे? महाराष्ट्रात सात लोकांनी चंद्रकांत हंडोरेंच्या ऐवजी पैसे घेऊन भाजपला मतं दिली, त्यांनी सोनिया गांधींचा आदेश धुडकावला तरीही त्यांना संरक्षण मिळतं आहे पक्षातून त्यामुळे पक्षात काय चाललंय याचाच विचार करावा लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

गुलाम नबी आझाद यांच्याबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देणं ही दुःखद बाब आहे. गुलाम नबी आझाद हे आमचे ज्येष्ठ नेते होते. इंदिरा गांधींनी त्यांना शोधलं. त्यांना युथ काँग्रेसचं अध्यक्ष केलं होतं. प्रत्येक राज्याचे ते प्रभारी राहिले होते. अशा ज्येष्ठ नेत्याला आज पक्ष सोडून जावं लागतंय याचं दुःख वाटतं आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही दोन वर्षांपूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यात गुलाम नबी आझादही होते. त्यावेळी कोविड असल्याने आम्ही गोपनीय पत्र लिहिलं होतं. ते पत्र लिक झालं त्यातून काँग्रेसमध्ये बंडखोर गट तयार झाला असं वातावरण निर्माण केलं गेलं. मात्र काँग्रेस पक्ष बळकट होण्याच्या अनुषंगाने ते पत्र आम्ही लिहिलं होतं. आज एका ज्येष्ठ नेत्याला पक्ष सोडावा लागलं याचं वाईट वाटलं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT