अंजलीसोबत स्कुटरवर आणखी एक तरुणी; दिल्लीतल्या घटनेला नवं वळण

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Delhi Kanjhawala Death Case: नवीन वर्षाच्या पहाटे दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं दिल्लीच नव्हे, तर देशही हादरला. दिल्लीतील सुलतानपुरी येथे घडलेल्या या घटनेला नवीन वळण मिळालं आहे. कारने फरफटत नेलेल्या युवतीसोबत आणखी एक तरूणी होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. अंजली सिंह असे या मृत तरूणीचं नाव आहे. स्कुटीवर अंजली ही एकटी नव्हती, तिच्यासह तिची एक मैत्रिणही होती. ही मैत्रीण कोण होती? हे पोलिसांनी शोधलं असून, तिचा जबाबही नोंदवला आहे. आता कलम 164 अंतर्गत तिचा जबाब दंडाधिकार्‍यांसमोर नोंदवला जाणार आहे. (Delhi Kanjhawala Anjali Singh Death Case)

ADVERTISEMENT

पोलीस तपासातून या नवीन मिळालेल्या माहितीनुसार, नेमकं प्रकरण काय आहे हे उघड होत आहे. ज्यावेळी पोलिसांनी अंजलीचा रूट ट्रेस केला त्यावेळी या तरूणी बाबत समजले. त्यानंतर तिने दिलेल्या जबाबातून हे समोर आले की, अंजली ही एकटी नव्हती. ही तरूणी तिच्यासोबत होती, त्यावेळी स्कूटीचा आरोपींच्या कारशी अपघात झाला. अपघातानंतर अंजलीची मैत्रिण किरकोळ जखमी होऊन ती आपल्या घरी निघून गेली. अशा परिस्थितीत, अंजलीचा पाय हा कारच्या अॅक्सेलमध्ये अडकला आणि आरोपींनी तिला १३ किमी फरफटत नेले. यामुळे अंजलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नशेत धुंद असल्याने, तरूणीला फरफटत नेले आरोपींची कबुली…

ज्या कारमुळे अंजलीचा अपघात झाला, त्या कारमध्ये एकूण ५ जण होते. सुलतानपुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपींनी सांगितले की, त्यांनी मद्यपान केले होते. किशन विहारमध्ये त्यांनी स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली. या आरोपींनी कबुली दिली की, ते नशेत होते. ज्यावेळी त्यांनी, जोंटी गावाजवळ कार थांबवली तेव्हा त्यांना मुलगी गाडीत अडकलेली दिसली. आरोपींनी मुलीला गाडीखालून काढले आणि कडाक्याच्या थंडीत भर रस्त्यावर सोडले. अपघातानंतर तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

हे वाचलं का?

चित्रा वाघांचा उर्फीला इशारा, सुषमा अंधारेंनी केली कोंडी, म्हणाल्या…

पोलिसांच्या कारवाईवर अंजलीच्या कुटुंबीयांसह अनेकांचे सवाल

पोलिस उपायुक्तांनी या प्रकरणात म्हटलं होतं की, आरोपी मुलांनी काहीही चूक केलेले नाही आहे. यावर अंजलीच्या मामाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात की, मी पोलिसांच्या कारवाईवर सहमत नाही. एवढा मोठा अपघात होऊनही म्हणतात की आरोपींची कोणतीही चूक नाही? हे प्रकरण निर्भया प्रकरणासी मिळतं जुळतं आहे.

ADVERTISEMENT

गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून मागवला अहवाल!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलास आयुक्त संजय अरोरा यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली आणि तपास अहवाल सादर करण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाने सुलतानपुरी घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस लवकरच दिल्ली पोलिसांना अहवाल देणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT