उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पलने बंडखोरीचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पल यांना तिकीट नाकारण्याबाबत भाजपवर सध्या टीका होत असली तरीही गोवा विधानसभेसाठी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना पणजीतून तिकीट नाकारण्याबाबत पक्षाच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. उत्पलला आम्ही दोन जागांचा पर्याय दिला होता, […]
ADVERTISEMENT

गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पलने बंडखोरीचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पल यांना तिकीट नाकारण्याबाबत भाजपवर सध्या टीका होत असली तरीही गोवा विधानसभेसाठी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना पणजीतून तिकीट नाकारण्याबाबत पक्षाच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
उत्पलला आम्ही दोन जागांचा पर्याय दिला होता, त्यातील एक जागा ही भाजपची पारंपरिक निवडून येणारी जागा आहे. पण त्यांनी पणजीच पाहिजे असा हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही असं मत देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं. मनोहर पर्रिकर हे देखील संघटन शरण होते, संघटनेने एखादी गोष्ट सांगितली की ते कधीच नाकारायचे नाहीत. उत्पलकडूनही आम्हाला हीच अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
पणजीबाबत आम्ही उत्पल यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. ज्यावेळी गोव्यात भाजप सरकार संकटात होतं त्यावेळी बाबूश मोन्सेरात भाजपसोबत आले. त्यांना आपण त्यावेळी पणजीबाबत शब्द दिला होता. त्यामुळे तो पाळणे गरजेचे होते. अन्यथा भविष्यात पक्षावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाची ही अडचण सध्या समजून घ्यावी. सध्या दुसऱ्या जागेवरुन निवडून यावे आणि ५ वर्षानंतर त्यांना पणजीला पुन्हा देवू. मी आजच त्यांना याबाबतचा शब्द दिला.
उत्पल पर्रिकरांची बंडखोरी, सामना मधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र; काँग्रेसलाही टोमणे










