Devendra Fadnavis: “नागपुरात भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका”, फडणवीस भाजप नेत्यांवरच भडकले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis Speech in Nagpur BJP Meeting: नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला (BJP) तीन जांगावर पराभव पत्करावा लागला. विशेषतः नागपूर शिक्षण पदवीधर आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोर जावं लागलं. नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या पराभवावरून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पदाधिकारी आणि नेत्यांची चांगली कानउघाडणी केली. (deputy chief minister devendra fadnavis lashed out at the bjp leaders nagpur)

ADVERTISEMENT

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि खास करून आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Exclusive: आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा इगो.. म्हणून मेट्रो-3 ची हत्या, फडणवीस प्रचंड संतापले!

हे वाचलं का?

फडणवीसांनी नागपुरातील नेत्यांची चांगलीच कानउघाडणी या बैठकीत केली. नागपूरात कॉंग्रेसच्या नेत्यांप्रमाणे भाजपचे नेते होत चालले आहेत. लक्षात ठेवा, पक्ष आहे म्हणून आप आहोत. त्यामुळं आता जोमानं निवडणुकीच्या तयारीला लागा. आपल्याला राज्यात १५० जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या स्वतःच्या १५० जागा निवडून आणायच्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेच्या आणखी जागा निवडून येतील. पण आपल्याला आपल्या १५० जागा निवडून आणायच्या आहेत. आपल्याला २०-२०च्या मॅचसारखं काम करायचं आहे. येत्या काळात पाच वर्षांची निवडणुकीची कामं करायची आहेत, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केला.

ADVERTISEMENT

१५० विधानसभा जागांचं टारगेट म्हणजेच भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, असा निर्धार ठेवून भाजप कामाला लागली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर, आता नागपूर भाजप जोमानं आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलीय. यात महानगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

ADVERTISEMENT

भगतसिंह कोश्यारींना निरोप! शिंदे-फडणवीस राजभवनात

या बैठकीत भाजपचं संघटन मजबूत करणे, केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि मतदारांशी संपर्क वाढवणे, यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यकारिणी बैठकीचं उद्घाटन केलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपीय कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. नागपूरात कॉंग्रेसच्या नेत्यांप्रमाणे भाजपचे नेते होत चालले आहेत. पक्ष आहे म्हणून आपण आहोत, या शब्दांत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT