सीताराम कुंटेंनी रश्मी शुक्लांबाबत ठाकरे सरकारला दिलेल्या अहवालाबाबत फडणवीसांचा नवा आरोप
सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातला जो अहवाल ठाकरे सरकारकडे सादर केला आहे, त्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी नवा आरोप केला आहे. ‘सीताराम कुंटे यांना मी ओळखतो, ते अत्यंत सरळमार्गी आहेत. काल त्यांनी जो अहवाल सादर केला तो अहवाल त्यांनी तयार केला नसून नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला असावा आणि त्यावर सीताराम कुंटेंनी […]
ADVERTISEMENT
सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातला जो अहवाल ठाकरे सरकारकडे सादर केला आहे, त्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी नवा आरोप केला आहे. ‘सीताराम कुंटे यांना मी ओळखतो, ते अत्यंत सरळमार्गी आहेत. काल त्यांनी जो अहवाल सादर केला तो अहवाल त्यांनी तयार केला नसून नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला असावा आणि त्यावर सीताराम कुंटेंनी सही केली असावी’ असं आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Rashmi Shukla यांनी फोन टॅपिंगच्या परवानगीचा गैरवापर केला, सीताराम कुंटेंनी CM कडे सादर केला अहवाल
सीताराम कुंटे यांनी सादर केलेल्या अहवालात काही बदल करण्यात आले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सीताराम कुंटेंनी सादर केलेला अहवाल सांगतो की राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा अशाप्रकारे टॅपिंग करण्यात येतं, आम्हाला हा मुद्दा दाखवण्यात आला आणि दिशाभूल करून टॅपिंग करण्यात आली. मात्र या अहवालात ज्या टेलिग्राफ अॅक्टचा उल्लेख आहे त्यामध्ये जो टॅपिंगसंदर्भातला जो उल्लेख आहे त्यात असंही नमूद कऱण्यात आलं आहे की कोणताही गुन्हा होणार असेल अशी माहिती मिळाली तरीही टॅपिंग केलं जाऊ शकतं. मात्र एवढी ओळ त्या अहवालातून काढून टाकण्यात आली आहे. हा रिपोर्ट फॅब्रिकेटेड आहेत. माझा प्रश्न हा आहे की जेव्हा ACB कडून फोन टॅपिंग केलं जातं ते कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केलं जातं? तर तेही याच कायद्यान्वये केलं जातं.
हे वाचलं का?
‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना रश्मी शुक्ला भाजपच्या एजंटप्रमाणे वागल्या’
हा जो रिपोर्ट आहे त्यात यामध्ये हे म्हटलं आहे की टॉप सिक्रेट अहवाल प्रसारमाध्यमांसमोर आल्याने ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यात आहेत त्यांची नाहक बदनामी झाली. यावर माझा प्रश्न हा आहे की हा अहवाल जनतेसमोर आणला कुणी? मी तर या अहवालाचं कव्हरिंग लेटर दिलं होतं. हा रिपोर्ट नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला आहे. अनेक पत्रकारांनी मला तो रिपोर्ट पाठवला आणि ही माहिती दिली की नवाब मलिक यांनी हा रिपोर्ट आम्हाला पाठवला आहे. टीव्ही चॅनल्सही हे दाखवण्यात आलं की नवाब मलिक यांनी रिपोर्ट दाखवला.
ADVERTISEMENT
तिसरी बाब ही सांगितली जाते आहे की या अहवालात सांगितल्याप्रमाणे बदल्या झाल्याच नाहीत. नवाब मलिक यांनी समोर आणलेल्या अहवालात १२ बदल्या अशा आहेत ज्यांचा उल्लेख टॅपिंगमध्येही आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांनी पाठवलेला अहवाल हा बनावट आहे हा कोर्टात टीकणार नाही. आमच्याकडे या रिपोर्टविरोधात इतकी माहिती आहे की ती आम्ही योग्य वेळी सादर करू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT