उद्धवजी तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये गेलं असतं: फडणवीस
नागपूर: जर आमच्याशी भिडायचं असेल तर ईडी आणि सीबीआयच्या आडून नाही तर थेट समोरासमोर येऊन भिडा असं आव्हानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यांच्या याच आव्हानाला आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘जर पंतप्रधान मोदींनी एजन्सींचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे आत जेलमध्ये असतं. पण […]
ADVERTISEMENT

नागपूर: जर आमच्याशी भिडायचं असेल तर ईडी आणि सीबीआयच्या आडून नाही तर थेट समोरासमोर येऊन भिडा असं आव्हानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यांच्या याच आव्हानाला आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘जर पंतप्रधान मोदींनी एजन्सींचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे आत जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
ईडी-सीबीआय यावर नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘ई़़डी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले.. ईडी-सीबीआय का येतेय.. ती आम्ही नाही आणली.. ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली. याचं कारण काय आहे.. तर माननीय उद्धवजी ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा याची इतिहासात नोंद होईल.’
‘या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे वसुली.. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात. बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची. काहीही कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी-सीबीआय याकरता आली की, जो भ्रष्टाचार चाललेला आहे.’










