एकनाथ खडसेंच्या ED चौकशीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं. त्यासाठी त्यांना बुधवारी समन्स बजावण्यात आलं होतं. माझ्यावर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही यासंदर्भात भाजपवर टीका केली. आता या ईडी कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं. त्यासाठी त्यांना बुधवारी समन्स बजावण्यात आलं होतं. माझ्यावर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही यासंदर्भात भाजपवर टीका केली. आता या ईडी कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करतो आहे. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. भाजपमध्ये अशाप्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही’ असं म्हणत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये होते. नाशिकच्या परिवहन सेवेचे उद्घाटन केले यावेळी म्हटलं की आनंद आहे की, अतिशय अत्याधुनिक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम नाशिकला देत आहोत. ही अजून डेव्हलप करायला लागणार आहे. महानगपालिकेने ५० बसेस केंद्र सरकारकडे मागितल्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु निओ मेट्रो आणि बस सिस्टम या दोन्ही सुरु झाल्यानंतर एका आधुनिक शहरात नाशिकचे रुपांतर होईल.
काय आहे भोसरीचं भूखंड प्रकरण?
2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.