मंत्र्याचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकत असेल तर शेतकऱ्यांनाही संमती द्या-फडणवीस

मुंबई तक

नांदेडमधल्या देगलूरमध्ये पोटनिवडणूक होते आहे. त्याच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे आज देगलूर या ठिकाणी गेले होते. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी आपल्या खास खोचक शैलीत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार हे सगळ्या योजना बंद पाडणारं आणि सगळ्या कामांना स्थगिती देणारं सरकार आहे त्यांना धडा शिकवा असंही आवाहन फडणवीस यांनी देगलूरकरांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नांदेडमधल्या देगलूरमध्ये पोटनिवडणूक होते आहे. त्याच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे आज देगलूर या ठिकाणी गेले होते. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी आपल्या खास खोचक शैलीत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार हे सगळ्या योजना बंद पाडणारं आणि सगळ्या कामांना स्थगिती देणारं सरकार आहे त्यांना धडा शिकवा असंही आवाहन फडणवीस यांनी देगलूरकरांना केलं. एवढंच नाही तर नवाब मलिक यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

…म्हणून शेतकऱ्यांनी शेतात चक्क हर्बल गांजा पेरण्याची मागितली परवानगी

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. तर त्या मंत्र्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ती हर्बल तंबाखू आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. आमचे सदाभाऊ खोतही म्हणाले होतेच ना तुमच्या मंत्र्याचा जावई जर हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर मग शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू पिकवण्याची परवानगी द्या. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे ताशेरे झोडले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp