हो माझं ठरलंय! गुगलीही टाकणार आणि फटकेबाजीही करणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मी गुगलीही टाकणार आणि फटकेबाजीही करणार असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं आहे. मुंबईतल्या मैदानात ते क्रिकेट खेळले, त्यानंतर बोलले तेव्हा त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनात आक्रमक झाले होते. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवले. त्यात त्यांचा अभ्यासू बाणाही दिसून आला. त्यानंतर आता फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून भाजप विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे.

ADVERTISEMENT

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना रश्मी शुक्ला भाजपच्या एजंटप्रमाणे वागल्या’

आज देवेंद्र फडणवीस हे जेव्हा क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करून मग प्रसारमाध्यमांशी बोलले तेव्हा त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. ‘क्रिकेट खेळताना बॅटिंग मिळाली की मजा येते. माझं ठरलं आहे, मी वेगवान बॉलिंगही करणार, फिल्डिंगही करणार, गुगलीही टाकणार. लहान असताना क्रिकेट खेळायचो तेव्हा जेव्हा कधी फिल्डिंग करायचे तेव्हा एकदाही कॅच सोडला नाही.’ असं सूचक वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हे वाचलं का?

सध्या जे काही सुरू आहे त्यावरून त्यांनी ठाकरे सरकारवर टीकाही केली. सध्याच्या स्थितीत इतके लूज बॉल समोर दिसत आहेत की ते सीमारेषेबाहेर पाठवावेच लागतील. बॉलिंगबद्दल बोलायचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अत्यंत लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो, त्यामुळे समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण येते असंही फडणवीस म्हणाले.

काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..

ADVERTISEMENT

रश्मी शुक्ला प्रकरणावरही सवाल

ADVERTISEMENT

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारपुढे एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना मोकाट सोडणार आणि का पकडलं याची चौकशी करू हा सरकारचा न्याय आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. या सगळ्यामुळे सरकार कुणाला पाठिशी घालतं आहे ते स्पष्ट होतं आहे असंही फडणवीस म्हणाले.

जे काही संभाषण झालं आहे, जे रॅकेट झालं आहे त्यावर कारवाई करण्याची या सरकारची तयारी नाही. एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना काही मर्यादा बाळगणं गरजेचं आहे. पण जे बोलले आहेत त्यांच्याकडून मर्यादा पाळली जाईल हा विचार करणं मूर्खपणाचं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT