एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना सभागृहातच दिला गर्भित इशारा; करुणा मुंडेंनी घेतली भेट
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (२२ ऑगस्ट) विरोधक सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. विरोधकांनी सत्ताधारी विशेषतः एकनाथ शिंदे आणि ४० बंडखोर आमदारांना डिवचलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही पलटवार केला. याच राजकीय कलगीतुऱ्यात धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. त्यावर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत सभागृहातच गर्भित इशारा दिला आणि हे सगळं घडल्यानंतर करुणा मुंडेंनी थेट मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (२२ ऑगस्ट) विरोधक सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. विरोधकांनी सत्ताधारी विशेषतः एकनाथ शिंदे आणि ४० बंडखोर आमदारांना डिवचलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही पलटवार केला. याच राजकीय कलगीतुऱ्यात धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. त्यावर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत सभागृहातच गर्भित इशारा दिला आणि हे सगळं घडल्यानंतर करुणा मुंडेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच भेट घेतली.
विधानसभेत धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय घडलं?
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या विधेयकावर चर्चा झाली. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवलं.”
“यावेळी सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळतो आहे. अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली, तर पक्ष कोणता अन नगराध्यक्ष कोणाचा अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यापुढे निर्णय घ्यायचाच असेल, तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊद्या”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवारांचा वार, एकनाथ शिंदेंचा पलटवार; काय घडलं?