धनुष आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोटाचा निर्णय, सोशल मीडियावर केली घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समंथा प्रभू आणि नागा चैतन्या या दोघांच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता धनुषने ट्विट करून आम्ही दोघेही 18 वर्षांचं नातं संपवत आहोत अशी घोषणा केली आहे. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून हा निर्णय जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे धनुषने?

हे वाचलं का?

आम्ही मागील 18 वर्षांपासून एकत्र होता. खूप चांगला हा प्रवास होता. कुटुंबीयांचा आशीर्वाद होता. पण आम्ही आता दोघांही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा या अशयाची पोस्ट धनुषने लिहिली आहे.

धनुषचं लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर 2004 ला झालं होतं. या दोघांच्या लग्नाची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली होती. या दोघांच्या लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण पत्रिका दाखवूनच आत सोडण्यात येत होते. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू आहे. कस्तूरी राजा यांच्या ‘आदुकलाम’ (2011) या सिनेमात धनुषने काम केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच दोन वर्षांपूर्वी आलेल्या असुरन या सिनेमातील भूमिकेसाठीही त्याचं कौतुक झालं होतं.

ADVERTISEMENT

धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. धनुषने याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होते की, ‘‘काढाल कोंडे’ हा सिनेमा सहपरिवार पाहायला गेला होता. तेव्हा सिनेमाहॉलच्या मालकाने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्या हिची ओळख करून दिली होती. त्यावेळी आमच्यात फक्त हाय हॅलो झालं. नंतर सकाळी ऐश्वर्या मला दुसऱ्या दिवशी एक फुलांचा बुके पाठवला. त्यानंतर आम्ही भेटत राहिलो. ती माझ्या बहिणीची मैत्रिण देखील होती. नंतर आमची मैत्री झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT