Nitin Gadkari: धुळे-नंदुरबारचे रस्ते अमेरिकेसारखे करतो: गडकरी
धुळे: येत्या तीन ते चार वर्षात धुळे आणि नंदुरबारचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यासारखे करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते धुळ्यात आयोजित विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अनेक वर्षांपासून धुळे व नंदुरबार येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असून व विकास कामांचा शुभारंभही होत असल्याचा आनंद […]
ADVERTISEMENT
धुळे: येत्या तीन ते चार वर्षात धुळे आणि नंदुरबारचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यासारखे करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते धुळ्यात आयोजित विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
ADVERTISEMENT
अनेक वर्षांपासून धुळे व नंदुरबार येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असून व विकास कामांचा शुभारंभही होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकारकडून सरकारी जागेचा प्रस्ताव द्यावा त्याठिकाणी पैसा खर्च करून धुळे व नंदुरबारमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणार असून दोन्ही जिल्हे विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
तसे दोन्ही जिल्ह्यातून जाणारे सर्वच राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मंजुरी दिली असून लवकरच त्याठिकाणी काम सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.
हे वाचलं का?
धुळे व नंदुरबार जिल्हे हे मागासवर्गीय नसून दोनही जिल्हे विकासकामांमध्ये अग्रेसर दिसून येत आहेत. नवीन उद्योजकाच्या माध्यमातून तरुणांच्या हाती रोजगार देऊन दोन्ही जिल्हे विकसनशील बनवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
Nitin Gadkari: ‘मी माझे वर्षभराचे 1 लाख रुपये असे वाचवले’, पाहा गडकरी काय म्हणाले
ADVERTISEMENT
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तलावाची आवश्यकता भासेल त्याठिकाणी तलाव देखील बांधून देणार असल्याचे यावेळी गडकरी म्हणाले.
ADVERTISEMENT
देशातल्या टोल नाक्यांबाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले….
देशातल्या टोल नाक्यांबाबत नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. देशातले सगळे टोलनाके वर्ष भरात हटवण्यात येतील असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं होतं. देशातले सगळे टोलनाके वर्षभरात हटवण्यात येणार असून जीपीएसवर आधारीत टोलवसुली प्रणाली राबवण्यात येईल असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं होतं.
“मी हे सांगू इच्छितो की येत्या वर्षभरात देशातले सगळे टोलनाके हटवले जातील. याचा अर्थ टोलवसुली ही जीपीएसच्या माध्यमातून केली जाईल. जीपएसद्वारे काढण्यात येणाऱ्या फोटोंच्या माध्यमातून टोल घेतला जाईल” असं नितीन गडकरींनी म्हटलं होतं.
उत्तर प्रदेशातील अमरोहा या मतदार संघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं होतं. टोलनाक्यांवर मलई खाण्यासाठी छोटे-छोटे टोल उभारण्यात आले असं म्हणत नितीन गडकरी यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला होता.
नितीन गडकरी यांनी यावेळी फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱ्या वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. वाहनांना फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरी केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येईल. फास्टटॅगच्या माध्यमातून टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पेमेंटला चालना देण्यात आली आहे. 16 फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय प्रवास करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो आहे.
नितीन गडकरी चुकीच्या पक्षातला चांगला माणूस – अशोक चव्हाण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT