स्वतःला रॉबिनहूड समजतो का? हायकोर्टाने गजा मारणेला फटकारलं
तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुण्यापर्यंत आपल्या समर्थकांसह भव्य मिरवणूक काढल्यामुळे चर्चेत आलेला पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातून गजा मारणेला अटक करण्यात आली. आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द व्हावे यासाठी गजा मारणेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू २४ मार्चला झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने […]
ADVERTISEMENT
तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुण्यापर्यंत आपल्या समर्थकांसह भव्य मिरवणूक काढल्यामुळे चर्चेत आलेला पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातून गजा मारणेला अटक करण्यात आली. आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द व्हावे यासाठी गजा मारणेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू २४ मार्चला झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने गजा मारणे स्वतःला रॉबिनहूड समजतो का असं म्हणत फटकारलं आहे.
पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गजा मारणेची सबळ पुराव्यांअभावी सुटका झाली होती. तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने गजा मारणेला चांगलंच फटकारलं. सरकारी वकीलांनी आपली बाजू मांडत असताना गजा मारणेचे समर्थक त्याला महाराज असं संबोधतात. जेलमधून बाहेर आल्यानंतर विविध घोषणा देऊन त्यांनी त्याचं स्वागत केलं हे देखील निदर्शनास आणून दिलं. यावेळी खंडपीठाने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करुन गर्दी जमवल्याप्रकरणी गजा मारणेवर त्याचवेळी गुन्हा दाखल का केला नाही, यासाठी तीन दिवस का घेतले गेले असा प्रश्न विचारला.
गजा मारणेला वडापाव पडला महागात, दरोड्याचा गुन्हा दाखल
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुरुंगात कैद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काही कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडलं जात आहे. परंतू अर्जदाराची सुटका झाल्यानंतर घरी परतत असताना त्याने भव्य मिरवणूक काढली याबाबतही खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केलं. अर्जदार आरोपी स्वतःला रॉबिनहूड समजतो का असं म्हणत न्यायालयाने या प्रकरणातली सुनावणी ५ एप्रिलला ठेवली आहे.
ADVERTISEMENT