Sharad Pawar आणि CM Thackeray यांच्यात ‘या’ विषयांवर चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात मागील काही दिवसांपासून विसंवाद असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती.

याच दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी (28 जून) आधी मुख्यमंत्री आणि नंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय राऊतांची ही शिष्टाई कामी आली आणि यानंतर मंगळवार (29 जून) शरद पवार यांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. जे मागील काही दिवसांपासून महत्त्वाचे मानले जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेला पहिला मुद्दा:

पवार-ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. ही निवडणूक लवकरात लवकर झाली पाहिजे. असं आता शरद पवार यांना वाटतं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही याच अधिवेशनात झाली पाहिजे. कारण जेणेकरुन अध्यक्षांची निवड झाली म्हणजे मतभेदांच्या ज्या चर्चा आहेत त्या संपुष्टात आलेल्या आहेत असं स्पष्टपणे दिसून येईल. असं शरद पवार यांचं मत आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, निवडणूक आता एवढ्या तत्पतेने का घ्यायची. कारण दोनच दिवसांचं अधिवेशन आहे. तसंच सहा महिन्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका असणार आहेत. त्यापूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीचं संख्याबळ किती आहे हे दिसून येणार आहे. त्यामुळे ही अग्निपरीक्षा आत्ताच का द्यायची असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. त्याबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही एका प्रकारे महाविकास आघाडी सरकारची नेमकी स्थिती काय आहे हे दर्शवणारी असणार आहे. पण शरद पवार यांना आत्मविश्वास आहे की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याकडे पुरेसं संख्याबळ आहे.

अखेर या सर्व चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीसाठी तातडीने होकार दिला आहे. यासाठी शिवसेनेने व्हीप देखील जारी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील आपआपल्या आमदारांना व्हीप जारी करु शकतात.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा:

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली त्यातील दुसरा मुद्दा हा महामंडळांच्या नियुक्त्या यावर झाली असल्याचं समजतं आहे. कारण काही दिवसांपूर्वी एक छोटीशी नियुक्ती झाली आणि त्यावरुनच मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात विसंवाद वाढल्याचं समोर आलं होतं.

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळावर एका निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. जे उद्धव ठाकरे यांच्या सीएमओ ऑफिसमध्ये आधी काम करत होते. जऱ्हाड नावाचे हे अधिकारी आहेत. पण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही सांगण्यात आलं नव्हतं. कारण या मंडळावर नियुक्ती करण्यात यावी अशी प्रमुख मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच होती.

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षावर पोहचले

शक्यतो असा प्रकार असतो की, मंडळाचे मंत्री हे वेगळ्या पक्षाचे असतात आणि अध्यक्ष हे वेगळ्या पक्षाचे असतात. हा काही नियम नाही. मात्र, आघाडी सरकारांमध्ये एक प्रकारचं अंडरस्टँडिंग असतं.

उदाहरणार्थ पर्यावरण खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे जायला हवं. पण याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी परस्पर नेमणूक करुन टाकली. हीच गोष्ट शरद पवारांना रुचलेली नाही.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार हे सतत मगाणी करत होते की, महामंडळांच्या नेमणुका या ताबडतोब झाल्या पाहिजे. ही पवारांची प्रमुख मागणी केली होती. पण त्या नेमणुका टाळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत का? अशी शंका शरद पवार यांना होती. म्हणून हा विसंवाद होता. याच मुद्द्यावर देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

या दोन प्रमुख मागणींवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT